वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक
वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.
प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई : वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.
वसईच्या राजीवली वाग्रालपाडा परिसरात ही दगडफेक झाली... आज सकाळपासून या परिसरात वसई विरार महापालिकेची अनाधिकृत बांधकामावर तोडक कारावाई सुरू होती.
या परिसरात 10 ते 15 हजार अनधिकृत चाळी असून या अवैध बांधकामांवर महापालिकेनं बुधवारपासून कारवाईला सुरुवात केलीय. यावेळी शेकडो घरं तोडल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरू केली.
एक जेसीबी आणि एक गाडी स्थानिकांनी जाळलीय... तर आणखी एका जेसीबीची तोडफोड करण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला... पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांपैंकी काही जणांना ताब्यात घेतलंय... यावेळी
गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून इथं राहत असलेल्या लोकांच्या संतापाला पोलिसांना सामोरं जावं लागलं. यामुळे, पालिका अधिकाऱ्यांसमोर काम कसं करणार? असा प्रश्न उपस्थित झालाय.