Bhavali Dam : नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.  बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. भावली धरण परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळा सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धबधबे आणि मनमोह दृश्यांची जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे असतो. धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटनस्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे.


नाशिक जिल्ह्यातील तब्बल 35 पर्यटनस्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असले तरी धोकादायक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहेत. भावली धबधब्या वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी वाडीवरे, पेठ, हरसुल, नांदुरी गड, सुरगाणा, हरणबारी, निफाड, मांगीतुंगी या परिसरात पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. विशेषता भावली, मुकणे, वैतरणा, वालदेवी, दारणा,कश्यापी,गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर,चणकापूर धरण या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी येत आहेत.


कुंडमळा धबधब्यावर धोकादायक पर्यटन


लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर पर्यटकांनी काहीही धडा घेतला नसल्याचंच दिसून येतं. मावळमधल्या कुंडमळा धबधब्यावर तरुणाई धोकादायकरित्या पर्यटन करताना दिसून येतायत. कुंडमळा इथं पाण्याचा फ्लो मोठा आहे. तसंच मोठ मोठे खड्डे आहेत. मात्र केवळ  सेल्फी, फोटोसाठी असा धोका पत्करताना पर्यटक दिसतायत. याठिकाणी असलेला साकव पूल धोकादायक असल्याचंही सांगण्यात आलंय. मात्र त्यावरूनही प्रवाशांची ये-जा सुरूय.