COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुणे विद्यापीठात आज नेटसेट विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात खास पुणेरी शैलीत घोषणा देण्यात आल्या. काय होत्या या घोषणा, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण रोजगार देऊ न शकणाऱ्या पदव्या विद्यापीठाने परत घ्याव्यात, विद्यापीठाच्या नावे वडापावची गाडी चालवायची परवानगी मिळावी, 25 हजारांपर्यंत चोरी करण्याचं लायसन्स मिळावं, सुशिक्षीत बेरोजगार म्हणून दारूचे गुत्ते चालवण्याची परवानगी द्या, अशा या मागण्या होत्या.


या घोषणा ऐकून आश्चर्य वाटेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधरांच्या, या घोषणा ऐकून आश्चर्य वाटेल. पण उच्च शिक्षण असूनही नोकरी नसल्याने हताश झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदव्या विद्यापीठाला परत कऱण्याचा निर्णय घेतलाय. नेट सेट पीएचडी संघर्ष समितीने हा निर्णय घेतलाय. विद्यापीठात आंदोलन करत विद्यापीठाला बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलीय. 


या बेरोजगारीवर तोडगा काढणं विद्यापीठाला शक्य नाही हे तर उघडच आहे. पण विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनातून सध्याच्या शिक्षण पद्धतीचीच भीषण स्थिती उघड झालीय.