नाशिक : Student on attacked  : शहरातील वावरेनगर परिसरात एका विद्यार्थ्यावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. (Student on attacked at Nashik) या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली आहेत. महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या भांडणातून हा हल्ला करण्यात करण्यात आला आहे. वावरेनगर परिसरातील प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुण-तरुणींच्या भांडणानंतर धार धार हत्याराने हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. दरम्यान, हल्ला झालेला विद्यार्थी जखमी झाला आहे. मात्र, पुन्हा हल्ला होईल या भीतीने काही तरुण-तरुणी आणि जखमी विद्यार्थाने तेथून पळ काढला. जखमी मुलगा आपल्या मित्र-मैत्रिणीसह पळतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.


महाविद्यालयात गुन्हेगारीचे स्वरुप दिसून येत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हल्ल्यातील एका जखमी विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.