पुणे : गरवारे कॉलेजमध्ये युवा सेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून प्राचार्यांना घेराव घालण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं असून प्राचार्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.


का दिली विद्यार्थ्यांना नोटीस?


संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणावरुन हे आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता कॅम्पसमध्ये संविधान वाचनाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. 


प्राचार्यांनी माफी मागेपर्यंत आंदोलन


यामुळे संतप्त आंदोलकांनी प्राचार्यांना घेराव घातला. प्राचार्य माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयात ठिय्या देणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आंदोलकांनी प्राचार्यांच्या कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं.  कार्यालयात शाहु महाराजांचा फोटो लावण्याची मागणीही केली,.