COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळ : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात असलेल्या नवोदय विद्यालयात एका सातवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची घटना घडलीय. मात्र मृत मुलाच्या वडिलांनी हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. 


नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाने बाळगलेली गोपनीयता पालकांपुढे प्रश्न निर्माण करणारी ठरल्याने मृत विद्यार्थ्याचे ग्रामस्थ संतप्त झाले असून घाटंजी पोलीस ठाण्यात त्यांनी जमाव केला. 


निखिल रामप्रभु भरडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून नवोदय विद्यालयात तो सातव्या इयत्तेत शिकत होता. याबाबत पोलिसांनी तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी करत असून त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.