मयुर निकम, झी मीडिया बुलढाणा : कोरोना विषाणूच्या  प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी   गावागावातील शाळेच्या वर्गखोल्यात विलगीकरण कक्ष उभारले आहेत. मात्र अशा या विलगीकरण कक्षामध्ये पाहिजे तितके कर्मचारी उपस्थित नसतात. बऱ्याच गाव खेड्यांमध्ये ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला अनुसरून एक धक्कादायक प्रकार संग्रामपूर तालुक्यात मारोड गावात घडलाय. विलीगिकरण कक्षाच्या स्वच्छलयाची सफाई चक्क एका ८ ते १० वर्षाच्या  चिमुकल्या विध्यार्थी कडून करून घेतली असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील कोरोनाच्या  संशयित रुग्ण व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते २८ मे रोजी संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्हाधिकारी रामामूर्ती यांचा कोरोना च्या पुष्टभुमीवर तालुक्यातील गावात भेटी देऊन आढावा घेण्याचा दौरा असल्याने तालुक्यातील पंचायत समितीचे प्रशासन खळबळून घेले असता तालुक्यातील ज्या गावात विलीगिकरण आहे , त्या त्या गावा गावात गटविकास अधिकारी यानी विलीगिकरनाची साफ सफाई  करण्याचे आदेश दिले असल्याने गाव पातळीवर असलेले ग्रामपंचायत सचिव, सरपंच ,कर्मचारी प्रशासन यांनी घाई गरबडीत साफ सफाई केली.


मात्र तालुक्यातील मारोड येथील प्राथमिक शाळा या विलगीकरण कक्षात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने गटविकास अधिकारी यांच्या आदेशा दिले मात्र  ग्राम पंचायत पातळीवर विलीगिकरण मधील संडास साफ करण्या करीता चक्क एका  चिमुकल्याकडून संडास साफ करून घेण्यात आला असल्याचा व्हिडीओ तालुक्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


बऱ्याच गावखेड्यात कर्मचारी अनुपस्थित


कोरोनाच्या या महामारीच्या काळात खरंतर ग्रामसेवक तलाठी आणि गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे असतांना काही ठिकाणी हे कर्मचारी पोहोचलेच नाहीत. कुठे अधिकारी दुर्लक्ष करतात तर कुठे कर्मचारी त्यामुळे गावखेड्यात कोरोनाचा कहर वाढलाय हे तितकंच खरं...