रत्नागिरी : जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामधल्या येडगेवाडीतल्या विध्यार्थ्यांना, झी 24 तासच्या बातमीच्या दणक्यामुळे पुन्हा एकदा शाळेत जाता येऊ लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येडगेवाडीतल्य्या विद्यार्थ्यांना एसटी बसची सुविधा नसल्यामुळे शाळेत जाता येत नव्हतं. त्याची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर तातडीनं सूत्र हलली आणि सोमवारपासून येडगेवाडीत एसटी बससेवा सुरु झाली. 


बस सुरु झाल्यामुळे आता विध्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येत आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी चिपळूण डेपोची  चिपळूण-पाचांबे ही बस साडे नऊ वाजता येडगेवाडीत येत होती. मात्र दिवाळीच्या सुट्टीत ही बस अचानकपणे बंद करण्यात आली होती. बससेवा पुन्हा सुरु झाल्यामुळे, येडगेवाडी गाव तसंच शाळेनं झी 24 तासचे आभार मानले आहेत.