पुणे : परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींची आक्षेपार्ह पद्धतीनं झडती घेण्यात आल्याचा आरोप पुण्यातील एमआयटी संस्थेनं फेटाळला आहे.


विधीमंडळ अधिवेशनातही प्रकरण गाजले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात परीक्षा केंद्रावरील अधिकारी तसंच कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, विधीमंडळ अधिवेशनात देखील हा विषय उपस्थित झाला होता. शिक्षणमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयटीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.


संस्थेला बदनाम करण्यासाठी आरोप केल्याचा दावा


तक्रारदार विद्यार्थिनींना कॉपी करण्यास मज्जाव केल्यामुळं त्यांनी हे आरोप केले आहेत. मुलींना कॉपी करु द्यावी या आशयाच्या धमक्या पालकांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र आमच्या संस्थेत कॉपी चालत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संस्थेला बदनाम करण्यासाठी असे आरोप केल्याचं एमआयटीतर्फे सांगण्यात आलं. या परीक्षा केंद्रावर मुलींकडून मोठ्या प्रमाणावर कॉपीज सापडल्याचं एमआयटीकडून सांगण्यात आलं.