विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर `हॅकर्स`कडून डल्ला
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर (Student`s Scholarships) अज्ञात `हॅकर`ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले आहे.
योगेश खरे / नाशिक : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर (Student's Scholarships) अज्ञात 'हॅकर'ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले आहे. (Student's Scholarships were attacked by 'hackers' In Nashik)
शिक्षण विभागानं सदरची बाब गांभीर्यानं घेऊन पुन्हा नव्याने या विद्यार्थ्यांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आलेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालयाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हॅकरचा फटका बसला आहे.
केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे शिख, ख्रिश्चन, पारशी, जैन, नवबौद्ध व मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती अदा केली जाते.