Stunt on Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल; हातात झेंडा घेवून फोटोशूट
सुरक्षा भिंती ओलांडून समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी(Stunt on Samriddhi Highway) करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल(VIDEO viral) झाला आहे. हा प्रकार झी 24 तास च्या ड्रोन कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi Express Way) प्रवासांसाठी खुला झाला आहे. डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. समृद्धी महामार्गावर दुचाकीसह रिक्षाला प्रवेश नाही. सुरक्षेसाठी समृद्धी महामार्गावराच्या दुतर्फा सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या सुरक्षा भिंती ओलांडून समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी(Stunt on Samriddhi Highway) करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल(VIDEO viral) झाला आहे. हा प्रकार झी 24 तास च्या ड्रोन कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
समृद्धी महामार्गावर दुचाकी तसेच तीन चाकी रिक्षा यांना परवानगी नाही. यामुळे पादचाऱ्यांना देखील येथे जाण्या, मनाई आहे. त्यातच समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंज जवळ काही तरुणांनी स्टंटबाजी केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार-पाच टवाळखोर समृद्धी महामार्गावरच्या मधल्या लेनपर्यंत जात स्टंटबाजी करत फोटोशूट करत आहे. व्हिडिओ मध्ये काही तरुण हातात मोठा झेंडा घेवून फोटोशूट करताना दिसत आहेत.
समृद्धी महामार्गावर कुठेही थांबता येत नाही. या महामार्गावर वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यामुळे समृद्धी महामार्गावर अशा प्रकारची स्टंटबाजी करणे धोकादायक ठरु शकते. अशा प्रकार समृद्धी महामार्गावराच्या मधोमध उभ राहून फोटोशूट करणे या स्टंटबाज तरुणांच्या जीवासाठी तसेच येथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरु शकतो. तसेच यामुळे एखादा मोठा अपघात देखील घडू शकतो.
समृद्धी महामार्गावर सुरक्षा कठडे बसवलेले आहेत. मात्र, हे कठडे ओलांडून तरुणांनी या मार्गावर प्रवेश केला आहे. असून सुद्धा या टवळखोरांनी त्या सुरक्षा कठड्यांना ओलांडून थेट महामार्गावरच फोटोशूट सुरू केले. संबधीत यंत्रणा आता या स्टंटबाज तरुणांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास अशी वेग मर्यादा बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण ही वेग मर्यादा मोडतात. यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताच्या देखील घटना घडत आहेत.