Nikesh Arora Inspirational Story: कोणाला सर्वाधिक पगार असेल असे आपल्याला कोणी विचारलं, तर आपण मार्क झुकरबर्ग, सुंदर पिचाई यांची नावे घेऊ. पण यांच्यापेक्षा कोणी जास्त पगार घेतलेला व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? निकेश अरोरा असे त्यांचे नाव असून ते भारतीय मुळचे आहेत. अमेरिकेत सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. ते पालो ऑल्टो नेटवर्क्सचे सीईओ आहेत. 2018 पासून ते सायबर सिक्योरिटी कंपनी पालो आल्टोचे नेटवर्क्सचे नेतृत्व करत आहेत. वॉल स्ट्रीट जनेलच्या 2023 मधील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत त्यांच्या वेतनाची माहिती दिली आहे. त्यानुसार निकेश अरोरा यांना 151.43 डॉलर इतके कंपनसेशन मिळालंय. पालो आल्टो नेटवर्क्सच्या भरपाईत जास्त करुन स्टॉकचा समवेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकेश अरोरा यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये झाला. त्यांनी दिल्लीच्या एअर फोर्स पब्लिक स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर आयआयटी बीएचयूमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगदेखील केली. पुणे शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. येथे नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून त्यांनी एमबीए आणि बोस्टन कॉलेजमधून त्यांनी फायनान्समध्ये एमएसची डीग्री मिळवली. गुगलमध्ये चीफ बिझनेस ऑफिसर बनून त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. भरपाई घेऊन त्यांनी 2014 मध्ये सॉफ्टबॅंकचे संचालकपद सोडलं.हे जपानासाठी एक रेकॉर्डब्रेक पॅकेज मानले जात होते.


अ‍ॅडोबचे शंतनू नारायण दुसऱ्या स्थानावर 


भारतीय मूळच्या सर्वाधिक पगार मिळवणाऱ्यांच्या यादीत अ‍ॅडोबचे शंतनू नारायण हे दुसऱ्या स्थानावर आहेत. जे या यादीत अकराव्या स्थानी आहेत. शांतनू नर नारायण यांचा जन्म आणि पालन पोषण हैदराबाद येथे झाले.  1998 मध्ये कंपनीत आल्यानंतर ते 2007 पासून अ‍ॅडोबचे सीईओ आहेत. शांतनू नारायण यांनी 44.93 डॉलर इतकी कमाई केल्याचे वृत्त एका रिपोर्टमध्ये आले आहे. 


दुसरा क्रमांक 


वॉलस्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, या यादित ब्रॉडकॉमचे सीईओ हॉक टॅन पहिल्या स्थानावर आहेत. मलेशियाई मूळचे हॉक टॅनचा पगार 16.2 कोटी डॉलर म्हणजेच साधाकण 1 हजार 348 कोटी रुपये इतका आहे.हा त्यांचा वर्षभराचा पगार आहे. या यादीत निकेश अरोरा यांचा दुसरा नंबर लागतो. 2023 मध्ये त्यांना 15.14 कोटी डॉलर म्हणजेच साधारण 1 हजार 260 करोड रुपये पगार मिळाला. अरोरा हे टॉप 500 जास्त पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत 500 व्या स्थानी आहेत. 


झुकरबर्ग यांच्यापेक्षाची 18 टक्के जास्त पगार


अरोरा यांची कमाई गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गच्या कित्येक पटीने जास्त आहे. सुंदर पिचाई यांनी मागच्या वर्षी साधारण 2.44 कोटी डॉलर म्हणजेच साधारण 200 कोटी रुपये आणि मार्क झुकरबर्ग यांनी साधारण 8 लाख डॉलर रुपये म्हणजेच 73 कोटी कमावले होते. मार्क झुकरबर्ग आणि निकेश यांच्या पगारात साधारण 18 टक्के इतका फरक आहे. म्हणजेच निकेश हे झुकरबर्ग यांच्यापेक्षाची 18 टक्के इतका जास्त पगार घेतात.


सिक्योरिटीपासून बर्गर विकण्यापर्यंत सर्व कामे 


एमबीए करताना त्यांना वडिलांकडून केवळ 75 हजार रुपये मिळाले होते. पण तेथे शिक्षणाचा खर्च खूप जास्त होता. हा खर्च भागवण्यासाठी निकेश अरोरा यांनी अनेक प्रकारची कामे केली. कधीकाळी त्यांनी सिक्योरिटी गार्डच्या नोकरीपासून बर्गर विकण्यापर्यंतची अनेक कामे केली.