नवी मुंबई : नेरूळ - उरण रेल्वे मार्ग कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आज या मार्गावरील खारकोपपर्यंत लोकल सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. रेल्वे आणि सिडकोच्या पथकाने गुरूवारी या मार्गावर प्रत्यक्ष लोकल चालवून  चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली  असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेरूळ - उरण लोकलमुळे या पट्टय़ातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याबाबत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या शुक्रवारी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने नेरूळ - खारकोपर - बेलापूर मार्गाची चाचणी घेतली होती. 


आज नेरुळ - उरण या मार्गावर प्रत्यक्षात बारा डब्यांची लोकल चालविण्यात आली.  यावेळी  रेल्वेच्या संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी आणखी काही चाचण्या करावयाच्या आहेत. आतापर्यंत कधी सेवा सुरु होणार याची उत्सुकता ही काही दिवसात संपुष्टात येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेली नेरूळ ते खारकोपरपर्यंत प्रत्यक्षात लोकल धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.