मुंबई : महाराष्ट्रात राजकीय नाट्य स्थिरावल्यानंतर भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजकीय पार्श्वभूमीचा नसून सुधीर मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नातील आहे. शलाका सुधीर मुनगंटीवार हीचं 1 डिसेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला. नागपूरच्या एम्प्रेस पॅलेस या ठिकाणी झालेल्या या लग्न सोहळयात संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या लग्नसोहळ्यात बाप मुलीच्या इच्छेखातर बरंच काही करत असतो. असंच काहीस महाराष्ट्राचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आपल्या मुलीच्या लग्नात त्यांनी आपल्या आणि कुटुंबियांची हौस मौज केली आहे. कुटुंबातील सर्वच लोकांनी या सोहळ्यात भाग घेतला पण सुधीर मुनगंटीवार या सोहळ्यात शो टॉपर ठरले. 


या सोहळ्याच्या अगोदर संगीत सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात सुधीर मुनगंटीवार आणि त्यांची पत्नी सपना मुगंटीवार यांचा एक डान्स परफॉर्मन्स झाला. या डान्स परफॉर्मन्समध्ये सुधीर मुनगंटीवार त्यांची पत्नी आणखी दोन कपल्स दिसत आहेत. 'छोड दो आचल जमाना क्या कहेगा...', 'हम तो तेरे आशिक है....'; 'हम साथ साथ है... ' या तीन गाण्यांवर सुधीर मुनगंटीवार आणि त्यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांनी ठेका धरला आहे.  



1 डिसेंबर रोजी शलाका मुनगंटीवार हिचा विवाह  तन्मय बिडवई याच्याशी झाला आहे. तन्मय डॉक्टर असून लिलावती रूग्णालयात डॉक्टर म्हणून सेवेत आहेत. हा विवाह सोहळा अतिशय शाही पद्धतीने झाल्याचं सोहळ्यातील फोटोंमधून कळतंय.



या सोहळ्याला अनेक राजकीय मंडळी देखील उपस्थित होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लग्नाला होती. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



राज्यातील महत्वाचे नेते असलेले सुधीर मुनगंटीवार आपल्या मुलीच्या लग्नात पै पाऊण्यांची जबाबदारी सांभाळताना दिसले. राज्याची आणि कुटुंबियांची जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांनी खूप चांगली सांभाळली असं म्हणायला हरकत नाही.