Maharastra Politics: `सरकार पाडून दाखवा, नाहीतर राजीनामा देणार का?`, संजय राऊतांना ओपन चॅलेंज!
Sudhir Mungantiwar: शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल असं राऊतांनी म्हटलंय. पण आम्ही त्यांना आणखी मुदत वाढवून देतो, असं मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut: शिंदे आणि फडणवीस सरकार जास्त वेळ टिकणार नाही. हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार, असं वक्तव्य ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यावर आता राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना ओपन चॅलेंज दिलंय. (Sudhir Mungantiwar Open challenge to Sanjay Raut said Topple the government or give resign marathi news)
शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल असं राऊतांनी म्हटलंय. पण आम्ही त्यांना आणखी मुदत वाढवून देतो. फेब्रुवारी नाही तर 15 मार्चपर्यंत मुदत देतो. 15 मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का? मी तुम्हाला आवाहन देतोय, तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसंच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत सरकार पाडा, अन्यथा तुमचा वारसा नकली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले, असं राज ठाकरे बोलले असतील, तर ते मी एकलं नाही, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार की काय? अशी चर्चा होताना दिसत आहे.