ज्येष्ठ गायिका रजनी करकरे- देशपांडे काळाच्या पडद्याआड
आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका रजनी करकरे-देशपांडे यांचे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती पी.डी. देशपांडे आहेत
कोल्हापूर : आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका रजनी करकरे-देशपांडे यांचे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती पी.डी. देशपांडे आहेत
सुगम गायनात रजनी यांचा हातखंडा होता. ‘हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड’या संस्थेच्या त्या उपाध्यक्षाही होत्या. तसेच, सामाजिक कार्यातही त्यांना विशेष रस होता. गेल्या काही दिवसांपासून रजनी करकरे-देशपांडे यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे ३ ऑगस्टपासून त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर बारीक लक्ष ठेऊन होते. उपचारादरम्यान, त्यांना फिट्स येत असत. तसेच, फुफ्फुसाचा विकारही हाताबाहेर गेल्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.
लहानपनी वयाच्या पाचव्याच वर्षी त्यांना पोलिओच्या आजाराने ग्रासले. त्यात त्यांना अपंगत्व आले. पण, त्यांनी अपंगत्वावर मात करत गायनाचा छंद जोपासला. या छंदातूनच त्यांचे गायन बहरत गेले. त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावले. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रांवरुन गायनाचे कार्यक्रम सादर केले.