कोल्हापूर : ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी साखर कारखानदारांची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उसाच्या दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक  उद्या होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उद्याच्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमोर कारखानदारीच्या अडचणी मांडतील.. उद्या सकाळी १० वाजता सर्किट हाऊस याठिकाणी ही बैठक होणार आहे. उसाची पळवापळवी होऊ शकते, त्यामुळे कारखाने लवकर सुरु होणे गरजेचे आहे, अशी शेतकरीवर्गाची मागणी आहे 


तसेच कर्जाचा बोजा वाढल्याने साखर कारखानदारी अडचणीत आली. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी कारखानदारांना सहकार्य करावे. अशी मागणी सागर कारखानदारांनी केली आहे. त्यामुळे ऊस दराचा तोडगा कसा निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर उसाला दर मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.