Viral Video : सोशल मीडियामुळे (Social Media) कुणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. सोशल मीडियावरच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार (Social Media Star) झालेली अनेक उदाहरणं आहेत. एका व्हिडिओमुळे आज त्यांना संपूर्ण देश ओळखतो. मग ते पश्चिम बंगालमधले शेंगदाणे विकणारे भुवन बड्याकर असो कि छत्तीसगडमधला छोटा गायक सहदेव असो. एक व्हिडिओमुळे ते रातोरात स्टार झाले आणि त्यांचं नशीबच पालटलं. महाराष्ट्रातलं ऊसतोड मजूर असलेलं एक जोडपंही असं रातोरात स्टार झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर रिल्स
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड करणाऱ्या (Shugarcane Worker) एका जोडप्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. इन्स्टग्रामवर (Instagram) त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले असून लोकांचीही त्यांनी चांगलीच पसंती मिळतेय. या जोडप्याचं नाव आहे मनीषा हजारे (Manisha Hajare) आणि अशोक हजारे (Ashok Hajare). आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या या हजारे दाम्पत्याने एक स्मार्टफोन (SmartPhone) विकत घेतला. सहज म्हणून मनीषा हजारे यांनी एका हिंदी गाण्यावर लिपसिंक करत रिल्स (Reels) बनवला आणि तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला. 


त्यांच्या पहिल्याच व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळाली. अनेकांनी त्यांच्या व्हिडिओचं कौतुक केलं, अनेकांनी त्यांच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केले. या एका व्हिडिओने हजारे दाम्पत्य रातोरात स्टार झाले. पहिल्याच व्हिडिओला पसंती मिळाल्यानंतर मनीषा हजारे यांनी अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या हिंदी गाण्यावर लिंपसिंक करत त्या व्हिडिओ अपलोड करत, त्यांच्या व्हिडिओत अशोक हजारेही आवर्जुन असतात. 


कधी ऊसतोडणी करताना वेळातवेळ काढून तर कधी बैलगाडीवर हजारे दाम्पत्य व्हिडिओ बनवू लागल. त्यांचे व्हिडिओ लोकांना आवडू लागले आणि महाराष्ट्रभर हजारे दाम्पत्य लोकप्रिय झालं. पण कष्टकरी समाजातील या दाम्पत्याची लोकप्रियता काही जणांना पाहावली नाही. काही अज्ञातांनी त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं. सोशल मीडियाची फारशी माहिती नसल्याने त्यांनी आपल्या अकाऊंटवर आवश्यक असलेल्या सेटिंग केल्या नव्हत्या. याचाच फायदा घेत त्यांचं अकाऊंट हॅक करण्यात आलं. 



अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावर काही विकृत लोकांनी आक्षेपार्ह व्हिडिओ करायला सुरुवात केली. समाजात चुकीचा मेसेज पसरवणारे मेसेजही शेअर केले जात होते. यातून हजारे दाम्पत्याचा बदनामी करण्याचा कट होता. अचानक घडलेल्या या घटनेने हजारे दाम्पत्य घाबरलं. पण समाजात जशी वाईट प्रवृत्तीची लोकं असतात, तशीच चांगल्या वृत्तीची लोकं असतात. काही जण हजारे दाम्पत्याच्या मदतीला धावले. त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ काढून टाकले आणि त्यांना अकाऊंट सुरक्षित कसं ठेवता येईल याचं मार्गदर्शनही केलं. आता त्यांचं अकाऊंट पूर्ववत झालं असून त्यांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. 


सोशल मीडियामुळे स्टार
लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा हे' या गाण्यामुळं कोलकातात रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन गुजरान करणारी राणू मंडल सोशल मीडियावर रातोरात स्टार झाली. अगदी सहजतेनं गाणाऱ्या राणूला पाहून एका व्यक्तीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राणूला प्रसिद्धी मिळाली. याशिवाय आपल्या अनोख्या डान्स स्टेपमुळे डब्बू अंकल उर्फ संजीव श्रीवास्तव अचानक चर्चेत आले. एका लग्न सोहळ्यात गोविंदाच्या गाण्यावर डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रातोराते ते स्टार झाले. नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्धी मिळवणारी प्रिया प्रकाश वॉरियरचा एका सिनेमातील एक क्लीप व्हायरल झाली आणि तिच्या अदांनी तरुणाईला वेड लावलं.