पुण्यात धक्कादायक घटना, दोन मुली-पत्नीची हत्या करुन केली आत्महत्या
दोन मुली आणि पत्नीची खून करून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवणे परिसरातील ही धक्कादायक घटना घडली.
पुणे : दोन मुली आणि पत्नीची खून करून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवणे परिसरातील ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, कर्जबाजारीपणातून कृत्य केल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. मात्र, पोलीस सर्व बाजुने तपास करत असल्याची माहिती आहे.
नीलेश चौधरी (३९), निलम चौधरी (३४), श्रावणी (१०), श्रीया (७) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मुली पुण्यातच शिक्षण घेत होत्या. या दोन्ही मुली खूप हुशार होत्या. त्यांचा शाळेत नेहमी पहिला, दुसरा क्रमांक असायचा. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.