पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू  समितीनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. पुण्यात  पालकमंत्री गिरीश बापट ध्वजारोहणासाठी जाण्याआधी  शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या  रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करू नये यासाठी आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातघेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.