नाशिक : देशविदेशात लोकप्रिय ठरलेला सुला फेस्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार आहे. 


अमित त्रिवेदीचा कार्यक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्टपूर्ण संगीताने ठसा उमटवलेले अमित त्रिवेदी आपली गाणी सादर करणार आहेत. आतापर्यंत या सोहळ्यात सुफी गायक कैलास खेर, अमर रामसह अनेक नामवंत गायकांनी उपस्थिती लावली आहे.  


परदेशी कलाकारांची उपस्थिती


भारतीय लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीताच्या मिश्रणातून अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना युवा पिढीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गंगापूर रोडवर धरणाजवळ दोन दिवस चालणा-या या सोहळ्यात, स्थानिक कलाकारांसह अनेक परदेशी कलाकारांचं सादरीकरणही लक्षवेधक ठरणार आहे.