शहीद सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा गावात होणार अंत्यसंस्कार
सुमेध गवई यांचं पार्थीव नागपूरहून अकोल्यातल्या त्यांच्या लोणाग्रा गावी रवाना झालं आहे.
अकोला : जम्मू काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अकोल्याचे जवान सुमेध गवई यांच्या पार्थीवावर, लोणाग्रा गावात आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुमेध गवई यांचं पार्थीव नागपूरहून अकोल्यातल्या त्यांच्या लोणाग्रा गावी रवाना झालं आहे.
सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पार्थीव अकोल्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या झैनापोरा भागात शनिवारी ही चकमक सुरु झाली होती. तब्बल १८ तास चाललेल्या या धुमश्चक्रीत अकोल्याचे सुमेध गवई आणि तामिळनाडूचे इलया राजा यांना वीरमरण आलं.