वर्धा : वर्ध्यातील सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दोन दिवसांपासून भरती असलेल्या विनोदवीर सुनील पालच्या बहिणीचा मृत्यू झालाय. शारदा पाल असं त्यांचं नाव आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुनील पालने केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिकावू डॉक्टरांकडून बहिणीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते असं सुनील पाल यांनी म्हटलंय. 


पाल यांनी आयसीयूमधील एक व्हिडिओसुद्धा बनलाय. पॅनक्राटिस या आजारानं त्रस्त असलेल्या सुनील पालच्या बहिणीवर हिंगणघाट इथं उपचार सुरू होते.



त्यानंतर त्यांना सावंगी इथल्या विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


मात्र, इथं बहिणीच्या उपचारात रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सुनील पालनं केलाय.