अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य; 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी
मालेगावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. अमावास्येच्या रात्री मालेगावात तिघांनी हे अघोरी कृत्य केलं.
Nashik Crime News : अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य करण्यात आले होते. यावेळी नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्यात आला होता. निष्पाप मुलाचा नरबळी दिल्याचं ग्रामीण पोलिसांनी केलं उघड केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना मुलांचा नरबळी का दिला हे अद्याप उघड झालेले नाही. पोलिस अदित तपास करत आहेत.
काय आहे नेमका प्रकार?
मृत मुलगा गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता होता. बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचे ग्रामीण पोलिसांनी तपासात समोर आणले आहे. मृत मुलगा पोहाणे या गावचा राहणारा आहे. अमावस्येच्या दिवशी अघोरी कृत्य करून तीन जणांनी हा प्रकार केला होता. मालेगाव पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
एका निष्पाप मुलाचा खून कशासाठी केला जाऊ शकतो या संशयावरून ग्रामीण पोलीस नरवळीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. मालेगावात अंगात येणाऱ्या दोन जणांची चौकशी केली असता त्यातील एक जण पाच दिवसापासून गायब असल्याचा समोर आलं अधिक तपास केला असता पोलिसांना या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
पोलीस असल्याची बतावणी करत लाखोंची लुट
पोलीस असल्याची बतावणी करत 500 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 100 रुपयांच्या दुप्पट किमतीच्या नोटा देण्याच आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या तोतीया पोलिसाला कासा पोलिसांच्या सातर्कतेमूळे जेरबंद करण्यात यश आलं आहे. मधुकर बड अस या तोतीया पोलीसाच नाव असून तो पालघरच्या विक्रमगड मधील उटावली चौधरी पाडा येथील रहिवासी आहे. तलासरी शनवारपाडा येथील महेश रायात यांनी कासा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला विक्रमगड मधील राहत्या घरातून अटक केली आहे. आरोपी मधुकर बड या तोतीयाने फिर्यादी सोबत संपर्क साधून तुझ्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर त्या घेऊन ये त्या बदल्यात माझे मुंबईचे काही मित्र शंभर रुपयांच्या दुप्पट किमतीच्या नोटा देतात अशी फसवणूक करत फिर्यादीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारोटी येथे बोलवून घेतलं. त्यानंतर युनिकॉर्न बाईकवर आलेल्या दोघांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांची दोन बंडल म्हणजे तब्बल लाख रुपये आरोपी मधुकर बड याने ठेवण्यास सांगितले. फिर्यादीने पाचशे रुपयांच्या नोटा बॅगेत ठेवताच बाईक वरून आलेल्या दोन्ही आरोपीच्या साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याच लक्षात येताच पीडित महेश रायात यांनी कासा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मिळालेला बाईकचा नंबर आणि फिर्यादीने दिलेल्या नावा नंतर कासा पोलिसांनी चक्र फिरवत विक्रमगड येथून आरोपी तोतीया पोलिसाला अटक केली आहे. तर, आरोपी सोबत असलेल्या आणखी साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेत असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली आहे. या संदर्भात कासा पोलीस ठाण्यात भा.द.वी. 420 , 170 , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसंच अशा आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केल आहे .