नवी दिल्ली : Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेकडून निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र ठाकरे गटाला मोठा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाची सुनावणी थांबवता येणार नाही. निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकते, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. मात्र निवडणूक आयागोने कोणताही निर्णय देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाला ठोस निर्णय न घेण्याची न्यायालयाने सूचना केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. आता सोमवारी 8 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.



महाराष्ट्र सत्तासंघर्षाप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत शिवसेनेच्‍या चिन्‍हाबाबत कोणताही निर्णय घेवू नका, अशी सूचना यावेळी न्‍यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. तसेच हे प्रकरणी पाच न्‍यायमूर्तींच्‍या खंडपीठाकडे देण्‍याबाबतही आम्‍ही निर्णय घेवू, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. 


निवडणूक आयोगाच्‍यावतीने अरविंद दातार यांनी युक्‍तीवाद करताना सांगितले, निवडणूक आयाेग केवळ राजकीय पक्षाचाच विचार करतो. विधानसभेत काय होते यामध्‍ये आमचा हस्‍तक्षेपच नाही. आम्‍ही घटनात्‍मक संस्‍था आहे. त्‍यामुळे दहावी सूची हा वेगळा विषय आहे. यामध्‍ये आम्‍ही हस्‍तक्षेत करत नाही.