नवी दिल्ली : मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं मोठा हादरा दिला आहे. प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच आरक्षण प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. अॅडमिशन प्रोसेस आणि नोकऱ्यांबाबत या आरक्षणाचा उपयोग देण्यात येऊ नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. 


राज्यातल्या मेडिकल अॅडमिशन प्रोसेस आणि नोकरी भरतीत मराठा आरक्षणाचा उपयोग करण्यात येऊ नये असं कोर्टाने म्हटलं आहे. प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे देण्यात आलं असलं तरी आरक्षणाला नोकर भरती आणि अॅडमिशन्सबाबत मोठा धक्का न्यायालयाच्या निर्णयामुळे बसला आहे. न्यायालयाने तूर्तास केवळ मेडिकल अॅडमिशन्सचा उल्लेख केला आहे.