डीएसकेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
....
पुणे: डी एस कुलकर्णी यांच्या गुंतवणूक घोटाळाप्रकरणी त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांना पोलिसांसमोर शरण जाण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांचा अर्ज पुण्याच्या कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने शिरिषचा जामिन अर्ज फेटाळताना त्याला १८ जुनपर्यंत रोज सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहाण्यास फर्मावले होते. शिरिषला जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून अटकेपासून संरक्षण मिळाले होते.