पुणे : कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच संशयित माओवादी समर्थकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकाल येणार आहे. पुणे पोलिसांनी वरवरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, व्हर्नन गोंझालविस, गौतम नवलखा यांना माओवाद्यांशी संगममत करून देशातल्या बड्या व्यक्तींवर हल्ले करण्याचा कट रचल्याच्या आरोपात अटक केली.


एफआयआर रद्दची मागणी 


 या सर्वांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय. याप्रकरणी गेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना केस डायरी कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. आज याप्रकरणी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.