राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.
‘आत्ताच सरकार शिक्षण विभागात, दररोज एक वेगळा, जीआर काढत आहे. सरकारने करोडो रूपयांच्या जाहिराती करण्यापेक्षा तो खर्च जर शिक्षणावर केला तर गोरगरीबांच्या मुलांना चांगल शिक्षण मिळेल’.
‘राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीतून चालली आहे. राज्यातील ११३ शाळा बंद करण्याचा अयोग्य निर्णय सरकारकडून घेतला जात आहे’, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत केली.