Supriya Sule Support Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असली पावर परिवार मात्र एकत्र असल्याचे दिसत आहे. तशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक झाली.  मात्र, या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसून ही कौटुंबिक भेट असल्याचे शरद पवार आणि अजित पवार यांनी सांगितले. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची बाजू घेतली आहे.  अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात आल्या आहेत. अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी चांगलेच सुनावलं आहे. 


सुप्रिया सुळेंनी  घेतला अजित पवारांवर टीका करणा-यांचा समाचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार बाहेर पडले. मात्र याच अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका करणा-यांचा समाचार घेतला आहे. अजितदादा आणि आमच्या राजकीय मतभेद आहेत. मात्र मनभेद नाहीत असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. शरद पवारांनी राज्यात अनेक संस्था उभारल्या. या अनेक संस्थावर अजित पवारही आहे. तेव्हा अजित पवारांनी या संस्थांम धून बाहेर पडावं अशी मागणी करण्यात आली होती. त्याचाच सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची पाठ सोडली तेव्हा सुप्रिया सुळे या मुलगी म्हणून खंबीरपणे वडिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. 


पवारसाहेब आणि अजितदादा हे एकच 


राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फाळणी झाली. मात्र पवारसाहेब आणि अजितदादा हे एकच आहेत, वेगवेगळे नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. तशा प्रकारच्या घडामोडी देखील घडत असतात. शरद पवार यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत. कधी ते जाऊन शरद पवारांचा आशिर्वाद घेतात. तर, कधी भेट घेतात. तर, अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते आमच्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे असं म्हणतात. तर, एका नेत्याने आम्ही सर्व शरद पवारांसाठी काम  करत असल्याचे वक्तव्य केले होते. 


पुतण्याने भेट घेतली तर गैर काय? 


अजित पवारांसोबतच्या बैठकीबाबत अखेर शरद पवारांनीच खुलासा केला. अजित माझा पुतण्या आहे, त्याने भेट घेतली तर त्यात गैर काय असा सवालही शरद पवारांनी विचारला. अजित पवारांसोबतची बैठक गुप्त नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केले. तसंच भाजपसोबत जाणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितले.