मुंबई: पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्वप्नील मुख्य परीक्षेत (MPSC Main Exam) 2 वेळा उत्तीर्ण झाला. मात्र त्यानंतरही नोकरी नसल्याच्या तणावातून आणि घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याने आत्महत्या (Suicide) करत जीवन संपवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली. नुकतीच स्वप्निल लोणकरच्या घरी जाणून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी स्वप्निलच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. "लोणकर कुटुंबांना शासन मदत करणारच आहे. मात्र आम्ही देखील त्यांना जो काही सपोर्ट लागेल तो करणार आहोत", असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 



विद्यार्थ्यांनी इतक्या टोकाची भूमिका न घेता चर्चेतून प्रश्न सोडवावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू  मांडलीच आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे.  मात्र सरकारसोबत बोलण्यासाठी मी पुढाकार घेईन आणि यावर नक्कीच मार्ग निघेल असेही त्यांनी स्पष्ट  केलं आहे.


सुप्रिया सुळे यांनी स्वनिल लोणकर यांच्या कुटुंबाची यावेळी विचारपूस करत त्यांचं सांत्वन केलं. आज त्या दौंड येथे गेल्या होत्या.