Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात नेते मंडळींचा आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु आहे. दररोज इथे नवीन पण जुने मुद्दे समोर येत आहेत. 70 हजार कोटींच्या सिंचनाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गाजतोय. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सहीवरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केलाय.  फडणवीस यांनी सिंचनाची फाईल घरी का नेली? आणि ती फाईल अजित पवारांना दाखवली कशी? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करत निवडणूक संपल्यानंतर फडणवीस यांच्यावर कोर्ट केस करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा सुळे यांनी दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीसांना सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध करता आले नसल्यानं फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केलीय. दरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसनंही भाजपवर टीकास्त्र सोडलंय. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. (supriya sule Notice to file a case devendra fadnavis Maharashtra Irrigation Scam Maharashtra Assembly Election 2024 )


तरदुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी केस दाखल करण्याच्या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची खिल्ली उडवलीय. सिंचनाची फाईल माहिती अधिकारातून मागवता येते, त्यात कसला गोपनीयतेचा भंग होतो ? असा सवाल चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना विचारलाय.


आता सुप्रिया सुळेंनी फडणवीसांविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला खरा, पण हा फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरताच आहे की सुप्रिया सुळे याचा पाठपुरावा करणार याची चर्चा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांत सुरु झालीय.