पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चेंगरचेंगरीच्या घटनेवर सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. सरकारने आधी वरण भात द्यावा, मग पुरणपोळी देण्याचा विचार करावा, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 


बुलेट ट्रेन म्हणजे पुरण पोळी, आणि रेल्वे म्हणजे वरणभात, जर माणसाला वरणभात, भाजीपोळी खायला मिळत नाही, आणि तुम्ही त्याला पुरणपोळी देण्याचं स्वप्न दाखवत आहात, म्हणून आधी वरणभात तरी द्या, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानचं ऑडीट झालं पाहिजे, असं देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.