Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. बारामतीतही अटीतटीची लढत होत आहे. लोकसभेला बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात लढत होती. तर, विधानसभेला युगेंद्र पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये थेट लढत होत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार मैदानात उतरल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला होता. आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रतिभा पवार या प्रचारात सहभाग घेत असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. माझी आई कुठलीही भावनिक आव्हान करत नाही. आई लोकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंतचे सगळ्यांचे तिचे ऋणानुबंध संबंध आहेत, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.


एक लक्षात ठेवा मुलं हे दूध असतं आणि नातवंड हे दुधावरची साय असतात. आजीला दुधावरची साईच मुलापेक्षा नातवावर प्रेम असतं. आमचं कुटुंब जॉईंटच आहे. पण रेवती प्रिय आहे. माझं देखील तसंच आहे. मी घरी आले की सुप्रिया घरी आले पण रेवती घरी आली की अरे रेवती घरी आली. कुठल्याही आजोबांना आपल्या मुलापेक्षा नातवंडच प्रिय असतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


भाजपचा रडीचा डाव...


288 पैकी 163 जागेवर अपक्षांना पिपाणी चिन्ह दिले आहे. भाजप हा रडीचा डाव खेळत आहे. त्यामुळे याचं मला आश्चर्य वाटत नाही. अजित पवार यांनी स्वतः कबुली साताऱ्याच्या सभेमध्ये दिले आहे.  तुतारी आणि ट्रंपेट मुळेच साताऱ्याची सीट आली असं अजित पवार यांनी सांगितलेला आहे. यावरूनच दिसतंय की भाजप रडीचा डाव खेळत आहे. हे अजित पवार यांच्याच तोंडून आल आहे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.