Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे `जगात भारी` व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे `जगात भारी` व्यक्तीमत्त्व!
Diwali 2022 : राष्ट्रवादीच्या नेत्या, आणि शरद पवार यांच्या (Sharad Pawar) कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)फक्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच नव्हे, तर त्यांच्या मनमिळाऊ स्वभासाठीसुद्धा ओळखल्या जातात. अशा या सुप्रिया सुळे यांनी त्यांची यदाचीही दिवाळी (Diwali 2022) सर्व राजकीय डावपेच मागे टाकत कुटुंबासोबत साजरा केली. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! (Supriya Sule shares photos and video as sharad pawar and familiy celebrates diwali 2022 padwa and bhaubij)
सोशल मीडियावर (Social media) त्यांनी या व्यक्तीसोबतचा फोटोही शेअर केला. आता तुम्ही म्हणाल ही खास व्यक्ती कोण? तर, संपूर्ण पवार कुटुंबाच्या जीभेचे चोचले पुरवणारे आणि त्यांना जेवणात काय हवं नको ते पाहणारे हे आचारी, संपत. त्यांचे आभार मानत सुप्रिया सुळे यांनी एक फोटो शेअर केला. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये संपत Worlds Best cook असल्याचंही जाहीर केलं.
अधिक वाचा : Diwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
माणसाच्या मनाची वाट ही त्यांच्या पोटातून जाते असं म्हणतात. याच तत्त्वानं संपूर्ण कुटुंबाच्या मनात आपल्या पाककौशल्यानं घर करणाऱ्या या संपत काकांचं राज्यातल्या मोठ्या राजकीय कुटुंबाशी असणारं नातं पाहून अनेकांनाच कौतुक वाटलं.
यंदाच्याही वर्षी पारंपरिक पद्धतीनं पवार कुटुंबानं दिवाळी साजरा केली. दिवाळी पाडवा म्हणू नका किंवा मग भाऊबीज, कुटुंबप्रमुखांपासूनन ते अगदी तरुण सदस्यांपर्यंत सर्वांनीच या क्षणी आनंद लुटला.
सुप्रिया सुळे यांनी या क्षणांची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. इथे कुठेच राजकारणाची सावलीही नव्हती. फक्त होता आनंद... कुटुंब एकसंध असण्याचा, सणासुदीचा आणि आपलेपणाचा.