पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निकाल वर्षभरात लावण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. पण दीड वर्षं उलटलं तरी अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा निकाल लागला नाही तर १ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरकू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.



एसटी बस स्थानकांमधील सोयीसुविधांची वाणवा, एसटी गाड्यांची अपुरी संख्या आणि त्यामुळं होणारे प्रवाशांचे हाल याविरोधात सोमवारी स्वारगेट एसटी आगरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.