बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लीप समोर आली आहे. भाजपात प्रवेश केला म्हणून सुळे यांनी फोनवरून घरात घुसून ठोकून काढण्याची भाषा वापरल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांचे आरोप फेटाळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र या प्रकारानंतर राहुल शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र सुप्रिया सुळेंनी फोनवर वापरलेल्या भाषेमुळे मोठा वाद निर्माण झाला. सुप्रिया सुळेंनी धमकी दिल्याचा आरोप करत राहुल शेवाळे या ऑडिओ क्लीपसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. 



ऑडिओ क्लीप संभाषण


सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?
राहुल शेवाळे : हॅलो
सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो? राहुल शेवाळे : हां ताई.
राहुल शेवाळे : नाही.


सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे, की पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून...


राहुल शेवाळे : हां.. नाही नाही...


सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?


राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.


सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा.... हा हा, नाय तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोळसेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?


राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हनलं तुम्हाला मी


सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय. एक लक्षात ठेवा. राहुळ शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. मी गंभीर आहे. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्यासारखी खरी बाई नाहीय. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.


राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.


सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.