`विश्वास नांगरे-पाटील यांनी राग ठेवून पुतळा हटवला`
विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सातारा : माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. २६/११ हल्ल्याबाबत मी लिहिलेल्या लेखाबाबत आक्षेप असल्यामुळे मी उभारलेली शांतीदुताची शिल्पं काढली जात असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे.
साताऱ्यामध्ये ८ फेब्रुवारीच्या रात्री पोलीस मुख्यालयासमोरील कबुतराचा पुतळा पोलिसांनी काढून टाकला. तत्कालीन पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांनीच कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयासमोर लावला होता. पण वाहतुकीचं कारण पुढे करत हा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा हटवल्यानंतर खोपडेंनी विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर निशाणा साधला.
आयएएस केडरमधील उच्च वर्णीय अधिकारी साताऱ्याच्या एसपींपासून आयजी ते डीजी वर्णद्वेशी असल्याचा गंभीर आरोपही खोपडे यांनी केला आहे. मी केलेलं सगळं काम संपवण्याचा प्रयत्न अधिकारी करत असल्याचं खोपडे म्हणाले.