मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोला ड्रग्ज कनेक्शन सापडलंय.  रियासोबत काल ६ तास चर्चा केल्यानंतर आज सकाळी तिला पुन्हा बोलावण्यात आलंय. रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या ड्रग्ज विकण्याचा एंगल समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी १० पर्यंत रियाला NCB च्या कार्यालयात पोहोचावं लागेल. रिया समोर शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि राजपूतचा नोकर दीपेश सावंत यांना समोरासोर आणलं जाणार आहे. यामुळे कथित ड्रग्ज रॅकेटमधील सर्वांच्या भूमिका NCB ला स्पष्ट होणार आहेत.



कमर्शिअल बाजू


एजन्सीना काही फोन चॅट रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक डेटा सापडलाय. काही बेकायदेशीर ड्रग्जची खरेदी केल्याचा आरोप यांच्यावर आहे. याप्रकरणी रिया आणि शौविक चक्रवर्ती यांचं नाव जोडलं गेलंय.


अटकसत्र सुरुच 


या प्रकरणात मोठ्या माशाचा शोध सुरुयं. सुशांतच्या कथित मृत्यू प्रकरणी अटक सत्र सुरु झालंय. केसशी संबंधित ड्रग्ज कनेक्शचा तपास सुरु असल्याचे  नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या डेप्युटी डीजींनी सांगितले. एनसीबीने शनिवारी रात्री उशीरा नोकर दीपेश सावंतच्या रुपात ८ वी अटक केली.


सरकारी पुरावा 


एनसीबीकडून दीपेशला सरकारी पुरावा म्हणून सादर करण्यात येणारेय. दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. दीपेश या प्रकरणात जी काही माहिती देईल ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 


यापूर्वी सुशांत प्रकरणात चौकशी सुरु असताना, एनसीबीने शुक्रवारी अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान अशा 5 जणांना अटक केली होती. त्यापैकी अब्बास आणि करणला काही वेळातच जामीन मिळाला होता. तर कैजानला शनिवारी जामीन मिळाला आहे. त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. 


सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या वांद्रेतल्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मितू सिंहही सुशांतच्या फ्लॅटवर हजर होती. नीरज, केशव, सिद्धार्थ पिठाणीही यावेळी फ्लॅटवर हजर होते. सीबीआयने पुन्हा एकदा १४ जूनच्या त्या दिवसाबाबत मितू आणि घरातल्या सदस्यांची चौकशी केली असून १४ जूनच्या दिवसाचं रिक्रिएशन केले आणि सीबीआय टीम निघून गेली.