त्यांच्या आरक्षणावर सुशीलकुमार शिंदेंना आक्षेप
सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलंय
नागपूर : मागास समाजातील लोक सधन झाल्यावरही आरक्षण मागत असतील तर ती केवळ लाचारी आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय. मारवाडी फॉँऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलंय.
३०-४० वर्षांपूर्वी अस्पृश्यतेची भूमिका घेऊन बसलेले लोक आज पुढे गेलेत. इतर समाजातूनही आरक्षणाची मागणी होतेय. मला जेव्हा गरज होती तेव्हा मी स्कॉलरशिप घेतली मात्र सधन झाल्यावर घेतली नाही, असं शिंदे म्हणाले. ज्या धंद्यावरुन तुमची जात ओळखली जाते, तो धंदाच सोडून द्यावा, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.