Sushma Andhare's complaint against Sanjay Shirsat : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. शिरसाट यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यातस आली आहे,. पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शिरसाट यांच्याविरोधात संभाजीनगरात महिला आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. 26 मार्च रोजीच्या मेळाव्यात संजय शिरसाट यांनी टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने संजय शिरसाट यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आता पोलीस काय कारवाई करणार याचीही उत्सुकता लागली आहे. 


अंबादास दानवे  म्हणाले, संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून महिलांचा अवमान केला आहे. महिलांचा अवमान करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. क्रांती चौकात महिला आघाडीचं आंदोलन संपल्यानंतर दानवे यांनी आंदोलन स्थळी येऊन पोलिसांना शिरसाट यांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम्हाला फडणवीस यांनीच बंड करायला लावलं होते. अशी कबुली तानाजी सावंत यांनी दिल्यानंतर बरं झाले, तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली दिली, असं दानवे यांनी म्हटले आहे.