स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची
swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली.
सांगली : swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची, झटापट झाली. बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत माेर्चावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जिल्हा बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत बड्या थकबाकीदारांचे कर्ज माफ करायचा निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता.
यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अडवले. त्यानंतर जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे जिल्हा बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले आहेत. संचालक विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारला.