स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रोखली ऊस वाहतूक
कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसानं भरलेला ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टरची हवा सोडून दिली. त्याचबरोबर ट्रॅक्टरची मोडतोडही केली.
कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्याकडं हा उस घेऊन जात होते. ऊसाचा दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही कारखान्यांनी ऊसाची तोड करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना अद्दल घडवू असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला.