नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari Sanghatana's agitation) राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी (Diwali) आंदोलन (agitation) करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. नागपूरच्या (Nagpur)  संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या घेऊन संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर ( Nitin Gadkari's house) आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकशाही मार्गाने आम्ही गडकरी यांच्या निवस्थानाकडे निघालो होतो. मात्र आम्हाला अमानवीय पद्धतीने आम्हाला पोलिसांनी अटक केली आहे. आमच्याशी झटापट केली. हे निंदनीय आहे. आमचं आंदोलन दडपण्याचे प्रयन्त करु आहे. याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हा विषय सांगू, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.


परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.