पुणे : राज्यात गेल्या तीन महिन्यात तब्बल स्वाईन फ्लूमुळे ३०२ जणांचा बळी गेलाय. २०१८ च्या पहिल्या सात महिन्यात स्वाईन फ्लूचं प्रमाण अत्यल्प होतं. पण गेल्या तीन महिन्यात विषाणूंना पोषक वातावरण मिळाल्यानं स्वाईन फ्लू वेगानं पसरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३०२ जणांचा बळी गेला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 


स्वाईन फ्लू लस उपलब्ध


स्वाईन फ्लू टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. तापाची साथ सुरू झाल्यावर तात्काळ ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. या लसीचा परिणाम होण्यासाठी २-३ आठवडे लागतात... या लसीमुळे स्वाईन फ्लूचा धोका ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होतो. स्वाईन फ्लूची लागण होण्याआधीच ही लस टोचून घेणं आवश्यक आहे.


स्वाईन फ्लूच्या पेशंटनी मास्क घालणं अत्यावश्यक आहे किंवा कुठल्याही  मेडिकल दुकानांत मिळणारे मास्क तुम्ही वापरू शकाल. सर्जिकल मास्कही तुम्हाला या धोक्यापर्यंत वाचवू शकतात.