भंडारा येथे स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू तर चौघांना लागण
जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू झालाय. एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
भंडारा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू झालाय. एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
स्वाईन फ्लूला आळा घालणे जिल्हा रुग्णालयासाठी मोठे जिकरीचं ठरत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ६६० जणांची तपासणी करण्यात आलीय. त्यापैकी तिघांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला. तर ५९ संशयित रुग्ण आहेत. ४रुग्णांना स्वाईन फ्लू झालाय. तर १९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी खास विभाग तयार करण्यात आलेयत. मृत रुग्णांच्या गावातल्या इतर नागरिकांची रक्त तपासणी सुरु आहे.