चंद्रपूर : जंगलाच्या मोकळ्या वाटांवर जाऊन वन्य प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याची अनेकांची इच्छा असते. काही राष्ट्रीय उद्यानांमध्ये अशी सुविधाही पुरवण्यात येते. ज्यामधील एक नाव म्हणजे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प. दरवर्षी अनेकजण या व्याघ्रप्रकल्पाला भेट देत जंगलातील एका वेगळ्याच दुनियेची सफर करतात. जेथे त्यांना डरकाळी फोडणाऱ्या वाघोबांची एक झलक पाहायला मिळावी अशी अपेक्षाच असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वेळ अशी संधी मिळतेच असं नाही. पण, यातील काहीना नशिबाची आणि खुद्द वाघोबाचीही साथ मिळते. कसं? याचा प्रत्यय येत आहे, सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमधून. आपल्या मनमर्जीनुसार जंगलाच्या वाटांवरचा हा रुबाबदार वाटसरु, म्हणजेच वाघोबा एकदातरी समोर यावा आणि त्याची झलक कॅमेऱ्यात टीपावी अशी इच्छा बाळगून काही पर्यटक ताडोबाच्या भेटीवर गेले. 



पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


जिप्सीमध्ये बसून, हे पर्यटक निघाले. पाहता पाहता वाघोबा समोर आला आणि व्याघ्र प्रेमी  हेमंत गुहे यांनी प्रकल्पातील मटकासुर या प्रसिद्ध वाघाला आपल्या कॅमेरात कैद केलं. या व्हिडिओमध्ये मटकासुर बराच वेळ पर्यटकांना न्याहाळताना दिसत आहे. ज्यानंतर तो जिप्सी समोरून मोठ्या ऐटीत पुढे निघाला. मटकासुराने जवळजवळ एक ते दीड तास पर्यटकांना दर्शन दिलं. हे क्षण शब्दांत मांडतानाच एक वेगळा थरार डोळ्यांसमोर उभा राहतो, तर त्या वेळी प्रत्यक्षात मटकासुराला पाहून जिप्सीमध्ये असणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला असेल, असं म्हणायला हरकत नाही.