Tadoba Tiger Reserve Shocking News: चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांच्या जिप्सी रिव्हर्स घेता येणार नाहीत. जिप्सी रिव्हर्स घेण्यावर वन्य प्रशासनाने बंदी घालतली आहे. तसेच आता वन्य क्षेत्रात पर्यटकांना घेऊन गेलेल्या जिप्सींना यू-टर्न मारण्यासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. मागील पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या जिप्सींनी वाघांचा रस्ता अडवल्याच्या घटना दोनदा घडल्या आहेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोअर झोनमध्ये टी-114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी उभ्या असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वन्य प्रेमींनी यावर आक्षेत घेतला होता. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मोठा निर्णय घेत 10 जिप्सी गाईड व चालकांना पर्यटन साखळीतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित घटकांची बैठक घेत प्रशासनाने हा नवा नो यू-टर्नचा नियम लागू केला आहे. 


48 तासांमध्ये 25 जणांवर कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच गेल्या वर्षभराच्या काळात ज्या- ज्या पर्यटक जिप्सींनी व गाईड्सने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे अशा विविध 15 प्रकरणांमध्ये वेगळी स्वतंत्र कारवाई करत या 15 जिप्सी व गाईड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 48 तासात एकूण कारवाई झालेल्या जिप्सी आणि गाईड्सची संख्या 25 वर पोचली आहे. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक, जिप्सी चालक व गाईड यांच्यावर आणत असलेला दबाव लक्षात घेता त्यांना शिस्त लावण्यासाठी हा धडक निर्णय घेण्यात आलाय


पुन्हा आडवली वाघाची वाट


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पार्यटकांच्या जिप्सींनी वाघाची वाट अडवल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कोअर झोनमधील ताडोबा खटोडा रोडवरील वसंत बांधाराजवळ हा प्रकार घडला आहे. एका वाघ रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्ना असतानाच पर्यटकांच्या गाड्यांनी अशाप्रकारे (फोटोत दिसतंय त्याप्रमाणे) त्याची वाट आडवून धरली.



सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प


ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. या उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे राज्यातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ठरलं. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी तब्बल 115 वाघांचं वास्तव्य असून देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पापेक्षा ही संख्या फार जास्त आहे. वाघांनी सर्वाधिक संख्या असलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून ताडोबा देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.