TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती आणि कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या परीक्षेला आणि पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
TAIT Exam चे वेळापत्रक पाहा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी - 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
ऑनलाईन परीक्षा तारखा - 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)
गेल्या पाच वर्षांत दुसरी TAIT Exam घेतली नव्हती ती आज जाहीर झाली आहे. खर तर पहिली परीक्षेनंतर दुसरी परीक्षा सहा महिन्याने व्हायला पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्याने परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, आज ही दुसरी TAIT जाहीर झाली. यासाठी वेळोवेळी युवाशाही संघटना पाठपुरावा करत होती. अखेर त्यांना यश आले. यासाठी संघटनेने मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.आता ही परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती युवासाही संघटनेकडून देण्यात आली.