नागपूर : विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर नागपूर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आज संयुक्तपणे कारवाई सुरू झाली.  नागपुर शहरात सध्याच्या परिस्थितीत सुमारे साडे तीन हजार ऑटो रिक्षा रस्त्यावर धावतात. मात्र यापैकी एकही रिक्षा प्रवाशांकडून मीटर नुसार पैसे आकारत नाही. मनमानी पद्धतीने भाडं आकारलं जातंय.


आता नमीटरनुसारच भाडं आकारावं यासाठी संबंधित विभागातर्फे शहरात मोहीम राबवण्यात आली आहे. विना मीटर चालणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडं घेण्यास नकार दिला तर तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय.  


मात्र मीटरने भाडं देण्यात प्रवासीच तयार नसतात असा रिक्षाचालकांचा दावा आहे. रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडं अकरावं यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रीपेड ऑटोरिक्षा सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र रेल्वे स्टेशन वगळता इतर सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा सामान्य प्रवशांना उपलब्ध नाही. त्यामुळे रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याची सामान्य प्रवाशांची तक्रार असते... आता या कारवाईनंतर तरी रिक्षाचालकांवर वचक राहील अशी आशा आहे.